Seo Services
Seo Services

पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब

 



मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे, गडचिरोली, जालना आणि नांदेड जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता ३२ कोटी २३ लाख वीस हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या चारही रुग्णालयात स्थापत्यविषयक कामकाज करण्यासाठी सहा कोटी आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी २६ कोटी २३ लाख आणि वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 24, 2022 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.