Seo Services
Seo Services

किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या ७ वर्षात अडीज पटीनं वाढ झाली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.ते आज किसान सन्मान निधीच्या तीसऱ्या वर्धापनदिना निमित्त स्मार्ट शेती या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये बोलत होते. या योजनेअंतर्गत तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. सुरुवातीला ही योजना २ हेक्टरपर्यंतची जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच मर्यादित होती, नंतर सर्वच शेतकऱ्यांसाठी ती विस्तारण्यात आली. या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी विशेष तरतूद केली आहे. गेल्या सात वर्षात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आतापर्यंत ३ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात आधुनिक शेतीसाठी विशेष पावलं उचलली गेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गंगा नदीच्या किनाऱ्यावर ५ किलोमिटरच्या परिसरात शेती आणि फलोत्पादनावर भर दिला जाणार आहे. त्या बरोबरंच तेलबियांच्या आयातीवरील अवलंबित्त्व कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचंही ते म्हणाले.

किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 24, 2022 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.