Seo Services
Seo Services

भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चलन फुगवट्याचा दबाव दूर होत असल्यानं, भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. मजबूत सूक्ष्म आर्थिक धोरणं, ग्राहकोपयोगी वस्तुंच्या किंमतीमधली घसरण, वित्तीय क्षेत्राची मजबूती, सुदृढ कॉर्पोरेट क्षेत्र, आणि सरकारी खर्चाच्या गुणवत्तेवर वित्तीय धोरणाचा भर कायम असल्यानं ही वाढ कायम राहील, असं रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. मात्र, मंदावलेली जागतिक वाढ, भूराजकीय तणाव आणि जागतिक वित्तीय व्यवस्थेतले नवे तणावाचे प्रसंग यामुळे ही वाढ घसरण्याचा धोकाही उद्भवू शकतो, असंही या अहवालात नमूद केलं आहे. 

भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 30, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.