Seo Services
Seo Services

एमएमआरडीएद्वारे पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वे यांसारख्या विविध संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत २४ तास संवाद साधला जाणार आहे. पावसाळ्यादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणं, अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी या नियंत्रण कक्षांकडून नागरीकांना मदत मिळू शकेल. हा नियंत्रण कक्ष १ जून २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कार्यरत राहणार आहे. नियंत्रण कक्षाकडून ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि  १८००२२८८०१ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर ०१ जून २०२३ पासून मदतीसाठी संपर्क साधता येईल. 

एमएमआरडीएद्वारे पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना एमएमआरडीएद्वारे पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 31, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.