Seo Services
Seo Services

उन्हाळी कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेडमार्फत उद्यापासून कांदा खरेदीला प्रारंभ

 


मुंबई (वृत्तसंस्था) : उन्हाळ कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ संयुक्तरित्या महाराष्ट्रात तीन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा इथं या खरेदीचा प्रारंभ उद्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी नाफेड मार्फत कांदा खरेदी करावी यासाठी डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिलं हेाते. त्या आधारे ही खरेदी केली जाणार आहे. उद्यापासून नाशिक जिल्ह्यात १४ फेडरेशन आणि नोंदणीकृत फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे. तसंच पुणे, संभाजी नगर, बीड, धाराशीव, अहमदनगर इथंही प्रत्यक्ष कांदा खरेदीला सुरूवात हेाणार असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली.

उन्हाळी कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेडमार्फत उद्यापासून कांदा खरेदीला प्रारंभ उन्हाळी कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेडमार्फत उद्यापासून कांदा खरेदीला प्रारंभ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 31, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.