मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, रायगड आणि नवी मुंबई या ठिकाणी 40 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे 1 लाख 20 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यात पुणे आणि औरंगाबाद इथं 12 हजार 482 कोटी रुपयांच्या देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे.
नवी मुंबईच्या महापे इथं होणाऱ्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची पाचवी बैठक काल झाली. त्यात हे निर्णय घेण्यात आले.
राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
June 29, 2023
Rating:
No comments: