Seo Services
Seo Services

गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली : गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. १० वर्षांपूर्वी हे बाजारमूल्य केवळ ७४ लाख कोटी रुपये होतं. गेल्या १० वर्षात ते ४ पट वाढून ३०० लाख कोटी रुपये झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. त्यांच्या हस्ते आज मुंबईत AMC रेपो क्लिअरिंग लिमिटेट आणि कॉर्पोरेट डेब्ट मार्केट विकास फंडाचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

MSCI उदयोन्मुख बाजार निर्देशांकात तर भारताचं प्रमाण ६ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांवरुन साडे १४ टक्क्यांच्या पुढे गेल्याचं त्या म्हणाल्या. किरकोळ डिमॅट खातेधारकांची संख्या गेल्या १० वर्षात २ कोटींवरुन साडे ११ कोटींपर्यंत वाढल्याचं त्यांनी सांगितलं. म्युच्युअल फंड उद्योगातही मालमत्ताही ८ लाख कोटींवरुन ४४ लाख कोटींपर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली. 

गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 28, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.