Seo Services
Seo Services

खोटे बोलण्याचा अंत पाच राज्यात झाला.... मा. राजसाहेब ठाकरे


राजसाहेब ठाकरेंकडून मतदारांचं अभिनंदन, नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मुजोर भाषेला मतदारांनी उत्तर दिलं आहे’.
पिंपरी : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना थापेबाजी फार काळ चालत नाही. भाजपावर ही वेळ येणारच होती, अशी जहरीली टीका मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मुजोर भाषेला हे उत्तर असल्याचंही ते बोलले आहेत. मी पाच राज्यातील जनतेचं अभिनंदन करतो, त्यांनी या निमित्त चांगला पायंडा पाडला, असं सांगताना पप्पू आता परमपूज्य झाला आहे, असं राजसाहेब ठाकरेंनी म्हटलं आहे.
या निकालांमुळे मी पुन्हा एकदा गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करेन, कारण त्यांनी पहिल्यांदा मोदींना झटका दिला. गुजरात विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत १६५ वर असणाऱ्या भाजपाला त्यांनी ९९ वरती आणलं. त्यानंतर कर्नाटकात झालं आणि आता तेच या पाच राज्यांत दिसतंय. जुलमी राजवटीला इथल्या जनतेनं चांगली चपराक लावली आहे, अशा शब्दांत राजसाहेब ठाकरेंनी मतदारांच कौतूक केलं आहे. पुढे ते म्हणालेत की, ‘येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे. हा पूर्णपणे राहुल गांधींचा विजय आहे. गुजरातमध्येही त्यांनी एकहाती प्रचार केला होता. त्यामुळे पप्पू आता परमपूज्य झाला आहे’.
या देशातील लोकांना किती थापा ऐकायच्या, देशाची परिस्थिती लोकांना माहिती आहे. राजीनामा दिलेले आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेलही काही दिवसांनी बोलतील. त्यांनाही ही मोठ्या धोक्याची घंटा वाटली असेल, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असं राजसाहेब ठाकरे बोलताना म्हणाले. राज्यातही ही वेळ येण्याची शक्यता आहे, कारण फडणवीस सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही. पाडुंरग फुंडकर यांच्या निधनानंतर राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. चंद्रकांत पाटलांवर अतिरिक्त पदभार म्हणून हे काम सोपवलंय. त्याचबरोबर देशात राम मंदिर उभारण्याचे वातावरण नसताना हा भावनेचा मुद्दा उकरून काढला जातोय. देशात भाजपा सरकारने काही केलेलच नाही, त्यामुळे लोकांसमोर जायचं कसं यासाठी हा उद्योग सुरु आहे, अशी टीका राजसाहेब ठाकरे यांनी केली आहे.

खोटे बोलण्याचा अंत पाच राज्यात झाला.... मा. राजसाहेब ठाकरे खोटे बोलण्याचा अंत पाच राज्यात झाला.... मा. राजसाहेब ठाकरे Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on December 16, 2018 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.