Seo Services
Seo Services

केंद्रीय सशस्त्र पोलीसदल (सहायय्यक कमांडट) परिक्षा 2018 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

महेश आनंदा लोंढे (संपादक)

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 12 ऑगस्ट 2018 मध्ये घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडट) लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारावर, शारीरिक मानक परीक्षा, शारीरिक क्षमता परीक्षा आणि वैद्यकीय मानक परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या अनुक्रमांकांची यादी दिली आहे. वय, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात उमेदवारांना व्यक्तीत्व परीक्षेच्या वेळी मूळ प्रमाणपत्र सादर करावी लागतील.

सशस्त्र सीमा दल, उमेदवारांना शारीरिक मानक परीक्षा आणि संबंधित परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण कळवणार आहे. संबंधित उमेदवारांना यासाठीचे पत्र 12 फेब्रुवारीपर्यंत न मिळाल्यास उमेदवाराने सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालय महासंचालक यांच्याशी दूरध्वनी/फॅक्स 011-26104291 अथवा adrectt.ssbdel@nic.in या ईमेलवर किंवा पत्राद्वारे अथवा फॅक्सद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगाशी तात्काळ संपर्क साधावा.

लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांनी आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाच्या योग्य पानावर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. संबंधित प्रमाणपत्रांच्या स्कॅन प्रतीही उमेदवारांनी अपलोड करायच्या आहेत. ऑनलाईन तपशीलवार अर्ज 14/01/2019 ते 28/01/2019 या काळात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलीसदल (सहायय्यक कमांडट) परिक्षा 2018 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केंद्रीय सशस्त्र पोलीसदल (सहायय्यक कमांडट) परिक्षा 2018 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 11, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.