Seo Services
Seo Services

खेलो इंडीया-यूथ गेम्स -2019 पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर

 
पुणे : पुणे येथे आयोजित खेलो इंडीया युथ गेम्ससाठी विविध माध्यामातील क्रीडा पत्रकार वार्तांकनासाठी आले असून त्यांना एकाच ठिकाणी सुलभतेने वृत्त पाठविण्याची सुविधा होण्याच्या दृष्टीने अद्यावत मिडीया सेंटर उभारण्यात आले आहे.
नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा माध्यम समन्वयक रविंद्र नाईक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागातर्फे समन्वय साधण्यात येत आहे.
म्हाळूंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य इमारतीतील दुसऱ्या माळ्यावर हे मिडीया सेंटर आहे. देशभरातून आलेल्या पत्रकारांना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी इमारतीत प्रवेश करताच मदत तथा स्वागत केंद्र आहे. हे मिडीया सेंटर 8 जानेवारीपासून सुरु झाले आहे.
या संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मिलींद ढमढेरे म्हणतात ,प्रत्येक मोठ्या स्पर्धेचा प्रसिध्दी विभाग हा नेहमीच गजबजलेला असतो. ही स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्र व विविध वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कसोशीने प्रयत्न करत असतात. या दृष्टीने मोठ्या स्पर्धेचा प्रसिध्दी विभाग म्हणजे मिडीया सेंटर.. सकाळपासून रात्री पर्यंत सतत कार्यरत असते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रत्येक माहिती वेळोवेळी अद्यावत देण्यासाठी या विभागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवक मनापासून काम करत असतात. येथे देखील खेलो इंडीयाच्या विविध स्पर्धाचे अद्यावत निकाल देण्यासाठी 50 स्वयंसेवकांची फौज कार्यरत आहे.खऱ्या अर्थाने प्रसिध्दी विभाग ही स्पर्धेचा कणाच असतो.

ठळक वैशिष्टये
·   या ठिकाणी वाय-फाय, वायर इंटरनेट, कॉम्पुटर्स, प्रिंटर्स, मिडीया प्रतिनिधींना याच ठिकाणी स्पर्धेचे लाईव टेलीकास्ट बघण्याची सोय करण्यात आली आहे.
·         मिडीयाच्या प्रतिनिधींना प्रवासाकरिता बसेसची सोय केली आहे.
·         मिडिया प्रतिनिधीसाठी चहा, नाश्ता, भोजन सोय केली आहे.
·         प्राविण्य प्राप्त खेळाडूंची मुलाखात घेणेकरीता खास दालन तयार करण्यात आले आहे.
·         सोशल मिडीयामध्ये संपूर्ण माहिती प्रसारित करण्याकरीता फेसबूक पेज केले आहे.
·        सर्व मिडियाशी संपर्क करण्याकरिता व्हॉट्सअप चे ग्रुप तयार केले आहे.त्यामुळे संपूर्ण स्पर्धेची माहिती छायाचित्र व निकाल सर्व मिडिया प्रतिनिधीपर्यत तात्काळ पोहचते.
खेलो इंडीया-यूथ गेम्स -2019 पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर खेलो इंडीया-यूथ गेम्स -2019 पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 10, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.