Seo Services
Seo Services

घरकुल परिसरात महानगरपालिका उभारणार सुसज्ज दवाखाना


स्वस्तिक आवटे

चिखली : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सेक्टर नंबर 17/19 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अत्यंत सुंदर अशी घरकुल योजना राबवली असून, तिथे जवळपास सहा हजारच्यावर घरे बांधण्यात आलेली आहेत. एवढा जनसमुदाय पाहून त्या ठिकाणी, त्यांच्या आरोग्यासाठी आरक्षित जागेवर सुसज्ज दवाखान्याची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या मध्ये १ कोटी ९८ लाख ५८ हजार ८०५ रुपयांच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरियल चार्जेस वगळून दर मागवण्यात आले. त्यावर पवार पाटकर कन्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, हिरने कंट्रक्शन कंपनी, आणि पी. एन. नागणे, ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. यामध्ये पी. एन. नागणे  यांनी  १०.५ टक्के म्हणजे १ कोटी ७५ लाख ७९ हजार ६२७ इतक्या कमी दराची निविदा सादर केली. अधिक ५२ हजार ४० मटेरियल टेस्टिंग आणि २ लाख १९ हजार ७७ रॉयल्टी चार्जेस असे एकूण १ कोटी ७८ लाख ५१ हजार १०४ रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी आणि जवळच्या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होईल.
घरकुल परिसरात महानगरपालिका उभारणार सुसज्ज दवाखाना घरकुल परिसरात महानगरपालिका उभारणार सुसज्ज दवाखाना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 07, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.