Seo Services
Seo Services

एम आय एमचे आमदार इम्तियाज जलिल आज खरोखर जलील निघाला.- मारुती भापकर

                           
मी कुणबी जातीचा खरा दाखला काढला नव्हता, ज्यावेळी माझी दाखल्यावर मराठा अशी नोंद होती.तेव्हापासून एस.सी.एस.टी.आरक्षणाचे आम्ही कायम समर्थन केले. ओ.बी.सी.आरक्षणाचे समर्थन केले. नव्हे नव्हे या विषयावर जेव्हा जेव्हा आंदोलने झाली, तेव्हा तेव्हा त्यात खऱ्या मनाने मनापासून सहभागी झालो.त्यावेळी माझा समाज ही आरक्षणाची मागणी करत आहे, त्यावेळी आपण ही असाच मनापासून पाठिंबा द्यावा. असे म्हणालो होतो. मराठा क्रांती मुक मोर्च्याच्या माध्यमातून ५८ मोर्चे झाले. धनगर, मुस्लिम, लिंगायत आदी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे आम्ही व समाजाने कायम समर्थन केले असताना न्या.गायकवाड यांच्या मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी नुसार महाराष्ट्र शासनाने विधीमंडळच्या २८८ आमदार पारीत केलेल्या प्रस्तावानुसार मराठ्यांना १६% आरक्षण देण्याचा कायदा केला. या निर्णयाच्या विरोधात एस.टी. व ओ.बी.सी.समाजातिल काही लोकांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिल्या, एवढेच नव्हे मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. त्याची प्रतिक्रिया म्हणून बाळासाहेब सराटे यांनी ओ.बी.सी आरक्षणाची पुनर्रतपासणी करावी. अशी याचिका दाखल केली. हे सुरु असताना विधीमंडळात मराठा आरक्षण कायदा पारीत होताना काही न बोलणारे एम.आय.एम. आमदार इम्तियाज जलील यांनी अचानक मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली. भारीपचे नेते प्रकाश आंबेडकर, एम.आय.एम.चे नेते औसुद्दिन औवेसी, भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने आदिनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहुजन वंचित आघाडी माध्यमातून तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ओबीसी, मुस्लिम मतपेटी अधिक पक्की करण्यासाठी जलील यांची ही याचिका आहे का यावर वंचित आघाडीच्या नेत्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचे कायम आम्ही व सकल मराठा समाजाने समर्थन केलेले असताना, केवळ मतपेटीच्या गलिच्छ राजकारणासाठी एम.आय.एम.चा हा इम्तियाज इतका जलील का होतो ? हा जलील म्हणजे संपूर्ण मुस्लिम समाज नाही. स्वतःचे राजकारण चमकावण्यासाठी काही लोक समाजा- समाजात, जाती-जातीत, धर्मा-धर्मात अशा मुद्दयावरुन तेढ निर्माण करुन आपल्या मताच्या पोळ्या शेकण्याचा प्रयत्न करतील, म्हणून हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, बुद्धिष्ट आदिनी आपआपली विवेक बुध्दी जागृत ठेवुन, आम्ही सर्व भारतीय या भावनेतून ज्या त्या वेळचे राजकारण ओळखून भविष्याचा वेध घेऊन वाटचाल केली पाहिजे. अस मत मारुती भापकर यांनी व्यक्त केले.
एम आय एमचे आमदार इम्तियाज जलिल आज खरोखर जलील निघाला.- मारुती भापकर एम आय एमचे आमदार इम्तियाज जलिल आज खरोखर जलील निघाला.- मारुती भापकर  Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.