पैसे खात्यावर जमा होण्याची प्रक्रीया सुरू:उर्वरीत नावे नोंदविण्याचे काम युध्दपातळीवर
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा देशभरात शुभारंभ करण्यात आला असून राज्यातील 41 हजार 888 गावातील 55 लाख 92 हजार 886 पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती मंगळवार दि. 26 फेब्रुवारी 2019 पर्यंत राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. या शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रीया सुरू असून राज्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांची नोंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 24 रोजी गोरखपूर येथील कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान’ योजनेचे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत. योजनेच्या उद्घाटनानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनाही पैसे जमा झाल्याचे एसएमएस आले आहेत.
राज्यातील एकूण 44 हजार 84 गावांपैकी 41 हजार 888 गावांतील पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. मंगळवार दि. 26 फेब्रुवारी 2019 पर्यंत 55 लाख 92 हजार 886 पात्र शेतकरी कुटुंबांची नावे पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पहिल्या टप्प्यातील 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील 1518 गावातील 3 लाख 88 हजार 517 पात्र शेतकरी कुटुंब, सातारा जिल्ह्यातील 1714 गावातील 3 लाख 15 हजार 594 पात्र शेतकरी कुटुंब, कोल्हापूर जिल्ह्यातील 1216 गावातील 2 लाख 92 हजार 460 पात्र शेतकरी कुटुंब, नाशिक जिल्ह्यातील 1904 गावातील 2 लाख 68 हजार 643 पात्र शेतकरी कुटुंब, नांदेड जिल्ह्यातील 1527 गावातील 2 लाख 63 हजार 864 पात्र शेतकरी कुटुंब, पुणे जिल्ह्यातील 1811 गावातील 2 लाख 43 हजार 550 पात्र शेतकरी कुटुंब, जळगाव जिल्ह्यातील 1443 गावातील 2 लाख 30 हजार 840 पात्र शेतकरी कुटुंब, सांगली जिल्ह्यातील 724 गावातील 2 लाख 28 हजार 666 पात्र शेतकरी कुटुंब, सोलापूर जिल्ह्यातील 1077 गावातील 2 लाख 27 हजार 566 पात्र शेतकरी कुटुंब, औरंगाबाद जिल्ह्यातील 1253 गावातील 2 लाख 20 हजार 846 पात्र शेतकरी कुटुंब, बीड जिल्ह्यातील 1151 गावातील 2 लाख 5 हजार 282 पात्र शेतकरी कुटुंब, बुलढाणा जिल्ह्यातील 1296 गावातील 1 लाख 93 हजार 552 पात्र शेतकरी कुटुंब, लातूर जिल्ह्यातील 942 गावातील 1 लाख 84 हजार 694 पात्र शेतकरी कुटुंब, अमरावती जिल्ह्यातील 1931 गावातील 1 लाख 82 हजार 622 पात्र शेतकरी कुटुंब, उस्मानाबाद जिल्ह्यातील 732 गावातील 1 लाख 82 हजार 417 पात्र शेतकरी कुटुंब, परभणी जिल्ह्यातील 833 गावातील 1 लाख 64 हजार 503 पात्र शेतकरी कुटुंब, जालना जिल्ह्यातील 892 गावातील 1 लाख 56 हजार 299 पात्र शेतकरी कुटुंब, यवतमाळ जिल्ह्यातील 2017गावातील 1 लाख 45 हजार 934 पात्र शेतकरी कुटुंब, चंद्रपूर जिल्ह्यातील 1657 गावातील 1 लाख 18 हजार 650 पात्र शेतकरी कुटुंब, हिंगोली जिल्ह्यातील 702 गावातील 1 लाख 18 हजार 325पात्र शेतकरी कुटुंब, अकोला जिल्ह्यातील 972 गावातील 1 लाख 15 हजार 762 पात्र शेतकरी कुटुंब, गोंदिया जिल्ह्यातील 907 गावातील 1 लाख 14 हजार 258 पात्र शेतकरी कुटुंब, धुळे जिल्ह्यातील 622 गावातील 1 लाख 10 हजार 640 पात्र शेतकरी कुटुंब, भंडारा जिल्ह्यातील 855 गावातील 1 लाख 8 हजार 643 पात्र शेतकरी कुटुंब, वाशिम जिल्ह्यातील 796 गावातील 1 लाख 7 हजार 81 पात्र शेतकरी कुटुंब, रायगड जिल्ह्यातील 1873 गावातील 1 लाख 4 हजार 620 पात्र शेतकरी कुटुंब, नागपूर जिल्ह्यातील 1800 गावातील 1 लाख 3 हजार 831 पात्र शेतकरी कुटुंब, रत्नागिरी जिल्ह्यातील 1490 गावातील 86 हजार 676 पात्र शेतकरी कुटुंब, पालघर जिल्ह्यातील 918 गावातील 77 हजार 730 पात्र शेतकरी कुटुंब, ठाणे जिल्ह्यातील 859 गावातील 71 हजार 836 पात्र शेतकरी कुटुंब, वर्धा जिल्ह्यातील 1234 गावातील 71 हजार 184 पात्र शेतकरी कुटुंब, नंदुरबार जिल्ह्यातील 896 गावातील 68 हजार 110 पात्र शेतकरी कुटुंब, गडचिरोली जिल्ह्यातील 1575 गावातील 68 हजार 106 पात्र शेतकरी कुटुंब, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 751 गावातील 51 हजार 585 पात्र शेतकरी कुटुंब अशा राज्यातील एकूण 41 हजार 888 गावातील 55 लाख 92 हजार 886 पात्र शेतकरी कुटुंबांची नावे राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. ही आकडेवारी दि. 26 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतची आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत राज्यातील 55 लाख 92 हजार 886 शेतकरी कुटुंबांच्या नावांची नोंद
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 26, 2019
Rating:
No comments: