महाराष्ट्राच्या वतीने सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन!
मुंबई - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बिंग (air strike) करून ते नेस्तनाबूत केले आहे. जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले. या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांच्या तळावर केलेली कारवाई ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पुलवामा येथील हल्ल्यात शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाने सैन्यास संपूर्ण अधिकार दिले होते.
भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
जगातील मजबूत सैन्यांमध्ये भारतीय सैन्य आणि देश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 26, 2019
Rating:
No comments: