नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांनी आज नवी दिल्ली येथे नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात सातवे राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्रदान केले.
एकूण 13 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 3 लाख रुपये रोख रकमेचा जीवनगौरव पुरस्कारही समाविष्ट आहे. वर्ष वर्गवारीत 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार व्यावसायिक छायाचित्रकाराला तर 75 हजार रुपये रोख रकमेचा पुरस्कार हौशी छायाचित्रकाराला प्रदान करण्यात आला. व्यावसायिक आणि हौशी दोन्ही गटात प्रत्येकी पाच विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांची अनुक्रमे रक्कम 50 हजार आणि 30 हजार आहे.
अशोक दिलवाली यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एसएल शांथ कुमार यंदाचे सर्वोत्तम व्यावसायिक छायाचित्रकार ठरले.
गुरुदीप धीमण यंदाचे सर्वोत्तम हौशी छायाचित्रकार ठरले.
विशेष उल्लेखनीय पुरस्कार (व्यावसायिक)- अरुण श्रीधर, पी.व्ही.सुंदरराव,कैलाश मित्तल, मिहीर सिंग, रणिता रॉय
विशेष उल्लेखनीय पुरस्कार (हौशी)-रवी कुमार, एस. निलीमा, मनीष जैती, महेश लोणकर, अविजित दत्ता
यावेळी राठोड यांनी छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.
प्रत्येक छायाचित्रामागे एक गोष्ट दडलेली असते, असे सांगून राठोड यांनी यावेळी छायाचित्रांचे महत्त्व विषद केले आणि छायाचित्रकारांचे कौतुक केले.
पत्र सूचना कार्यालयाचे मुख्य महासंचालक सितांशू कार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे, आकाशवाणी एनएसडी महासंचालक इरा जोशी, डीडी न्यूजचे महासंचालक मयंक अग्रवाल, डीपीडी महासंचालक साधना राऊत, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिव नारायण जोशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते 7वे राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्रदान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 19, 2019
Rating:
No comments: