Seo Services
Seo Services

पुणे स्मार्ट वीक फर्ग्युसन व जंगली महाराज रस्त्यावर विविध रंगांत बहरू लागला वसंत


पुणे : फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेली एक रचना नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. त्याबद्दल अनेकजण उत्सुकत व्यक्त करत होते. स्मार्ट पुणे या नावाच्या हॅशटॅगची ही एक आकर्षक रचना येथे उभारण्यात आली आहे. पीएमपीएमएलचे संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते या इंस्टॉलेशनचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर "आपल्या भविष्याचा मार्ग" ही थीम घेऊन आरशांची एक विशिष्ट रचना असलेला फ्युचर टनेल एफसी रोडवरच उभारण्यात आली आहे. पुणे वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते फीत कापून या फ्युचर टनेलचे अनावरण करण्यात आले. येथून जाणाऱ्या वाटसरूंना विचार-उत्तेजन देणारा अनुभव या टनेलमध्ये मिळतो. येथील पादचाऱ्यांना आत्मसंवादाचा, स्वत:चे वेगवेगळी आणि अनेक प्रतिबिंब पाहण्याची संधी येथे आहे. "मी कोण आहे?" असा प्रश्न हा बोगदा पाहताना विचार करायला लावतो. रात्रीच्या प्रकाशामुळे दुसऱ्या प्रकाशात उजळून निघतो.


कला-प्रेमींसाठी बालगंधर्व कला दलन येथील राजा रवि वर्मा यांचे दुर्मीळ लिथोग्राफ आणि चित्रे ठेवण्यात आली आहेत. उर्वशी, रंभा, मदलसा आणि रुतुधवज, विश्वामित्र, मेनका आणि शकुंतला यांसारख्या पौराणिक पात्रांबरोबरच सीता वानस, अहिल्या उद्धार आणि सीता स्वयंवर यांसारखी रामायणातील क्लासिक दृश्ये प्रदर्शित केली आहेत. बडोदाचे महाराजा गायकवाड यांच्यासाठी लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये बनविलेली लक्ष्मी आणि सरस्वतीची सर्वात लोकप्रिय चित्रे देखील या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. अमोल बलवाडकर, श्री. अजित गाडगीळ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर याप्रसंगी प्रसिद्ध चित्रकार श्री सुहास बहुलकर यांचे अप्रतिम चित्र रेखाटण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

छायाचित्रकार राजेश जोशी यांनी छायाचित्रण कार्यशाळेच्या माध्यमातून छायाचित्रण कलेवर प्रकाश टाकला. कला सर्वांसाठी हे घोषवाक्य असलेल्या पुणे स्मार्ट वीकमध्ये पुणेच्या छोट्या कलाकारांनीही काही उत्कृष्ट कलाकृती काढल्या.

पुणे स्मार्ट वीक फर्ग्युसन व जंगली महाराज रस्त्यावर विविध रंगांत बहरू लागला वसंत पुणे स्मार्ट वीक फर्ग्युसन व जंगली महाराज रस्त्यावर विविध रंगांत बहरू लागला वसंत Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 19, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.