Seo Services
Seo Services

काँग्रेस पक्षातर्फे चलो वार्ड अभियानाव्दारे बेरोजगारांची नोंदणी सुरु





प्रतिनिधी/मदन जोशी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात युवक काँग्रेसच्या वार्ड चलो अभियानाव्दारे वाड्या-वस्त्यांवर जाऊन, बेरोजगार युवक युवती व जनसामान्यांशी संवाद साधून, पक्षाचा आगामी संकल्प लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आणि काँग्रेसची ध्येय धोरणे सांगून त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम शहर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. अशी माहिती युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

वार्ड चलो अभियानात कोपरा सभा, ठिकठिकाणी बैठकांमध्येयुवा शक्ती कार्ड व किसान शक्ती कार्डनोंदणी करुन घेण्यात येत आहे. तसेच केंद्रात व राज्यात असणाऱ्या भाजपा सरकारची निष्क्रीयता, नाकर्तेपणा, अन्याय व भ्रष्टाचार लोकांसमोर आणण्याचे काम युवक काँग्रेस करीत आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून युवा शक्ती कार्डसाठी एका महिन्यात साडेतीन हजारांहून जास्त बेरोजगार युवक युवतींनी नोंदणी केली आहे. आगामी काळात दहा हजार युवकांच्या नोंदणीचे उद्दीष्ट आहे. शहरी भागात युवा शक्ती कार्डव्दारे युवक युवतींना काँग्रेसचे सरकार आल्यावर, मासिक बेराजगार भत्ता देण्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वंयरोजगार कार्यालयांचे सक्षमीकरण, वसतीगृहांची निर्मिती, कमी व्याज दराने शैक्षणिक कर्ज व बीनव्याजी व्यावसायिक कर्ज असा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. तसेच ग्रामीण भागांत किसान शक्ती कार्डव्दारे कोरडवाहू जमीन शेतकरी व अल्प भूधारकांना पुर्ण कर्ज माफी, शेतीमालाला हमीभाव, अवजारे खरेदीसाठी सहाय्य, आवश्यक तेथे शीतग्रहांची निर्मिती व हवामान अंदाजासाठी वेधशाळांचे आधुनिकीकरण प्रकल्पांसाठी नोंदणी करून घेतली जात आहे त्याला देखील ग्रामिण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मोदी सरकारने देशातील जनतेला विश्वासात न घेता हुकूमशाही पध्दतीने एक रात्रीत नोटाबंदी लादली. त्यामुळे कोट्यांवधी जनतेला रोजगार बुडाला, देशभर आर्थिक मंदीचे सावट आहे. दोन वर्ष होऊन गेली तरी परिस्थितीत बदल झाला नाही. बेरोजगारीत पिचलेल्या युवकांना मदत करण्या ऐवजी हे सरकारपकोडे’  तळण्याचा सल्ला देते. शेतकऱ्यांना पुर्ण कर्ज माफी देण्याचे आश्वासन पाच वर्षांत पुर्ण करता आले नाही. वाढलेल्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर सहा टक्क्यांहून जास्त असल्याचा केंद्र सरकारचा अहवाल सांगतो. हि आकडेवारी मागील पंच्चेचाळीस वर्षांतील उच्चांक आहे. शहरी भागात तर बेरोजगारीचा दर 7.8 टक्के आहे. सुशिक्षित महिला बेरोजगारीचा दर 17.3 टक्के झाला आहे. शहरात महिला बेरोजगारीचा दर 27.2 टक्के इतका वाढला आहे. हा नोटाबंदी व जीएसटीचा परिणाम आहे. अशी माहिती नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

12
जानेवारी जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिनापासून सुरू झालेले अभियान मोरवाडी, कुदळवाडी चिखली, संत तुकाराम नगर, पिंपरी गांव, पिंपरी मंडई, भीमनगर, अजंठानगर दत्तनगर या भागात व एकूण 30 ठिकाणी यशस्वीरित्या राबवण्यात आले. शहरात सर्वत्र युवा शक्ती कार्ड नोंदणीस बेरोजगारांचा मोठा प्रतिसाद आहे. शहरात काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे व या अभियानांव्दारे जनसंपर्कातून – जनसहभाग वाढत दिसते. अशी माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

यावेळी करण गिल, हिराचंद जाधव, कल्याणी माणगावे, संदेश बोर्डे, नासिर चौधरी, वसीम इनामदार आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षातर्फे चलो वार्ड अभियानाव्दारे बेरोजगारांची नोंदणी सुरु काँग्रेस पक्षातर्फे चलो वार्ड अभियानाव्दारे बेरोजगारांची नोंदणी सुरु Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.