पुणे : देशातील सुमारे २३ टक्के लोकसंख्या उदासीनता डिप्रेशन व नैराश्यामुळे त्रस्त आहे. त्यामुळे भारतात दररोज होणाऱ्या आत्महत्यांची सख्या २०० पेक्षा जास्त आहे . यावर उपाय सुचाविण्यासाठी आणि दुख : नैराश्य व डिप्रेशनने ग्रासलेल्या रुग्णांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पुण्यातील सीडर संस्थेच्या वतीने लेट्स टाकँ डिप्रेशन या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे .
दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सुमन मुळगावकर ऑडिटोरियम, आय. सी. सी टॉवर्स, सेनापती बापट रोड, पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे. यात प्रवेश विनामुल्य असून पुण्यातील प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सोनल सोनवणी या मार्गदर्शन करणार आहेत.
उदासीनता दूर करण्यासाठी मनोवैज्ञानिक हस्तक्षेप हा या व्याख्यानाचा विषय आहे. यामुळे उदासीनते मुळे निर्माण होणाऱ्या समस्या व परिणामावर ५० टक्के नियंत्रण ठेऊ शकतो हे संशोधन व प्रयोगातून सिद्ध झाले आहे. भारतात जे आत्महत्या करतात त्यापैकी ९० टक्के रुग्ण हे गृह कलह , नातेसंबधात आलेले वितुष्ट , समाजात खालावलेली पत , प्रतिष्ठा , ढासळलेली आर्थिक परिस्थिती यामुळे आत्महत्या करतात असे एका पाहणीतून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील सर्वात जास्त मनोरुग्णाची संख्या भारतात आहे. पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सामुहिक पातळीवर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. रुगांवर वेळीच औषधोपचार होतात तरीदेखील त्यांचे योग्य समुपदेशन होत नसल्याने वैफल्य ग्रस्त परिस्थितीत ते आत्म्हत्येसारखे टोकाचे पाउल उचलतात . किवा तो धुम्रपान ,मद्यपान ड्रग्स अशा व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतो . यात किशोर वयीन युवक युवतींची संख्या मोठी आहे. म्हणूनच नैराश्य उदासीनता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णाच्या सभोवताली असलेल्यांनी मार्गदर्शित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. निराशा कशी ओळखावी ? आपल्या आसपासचा जो कोणी उदास, वैफल्यग्रस्त होत असल्याचे जाणवल्यास काय करावे ? त्याला सल्ला कसा द्यायचा ? निराश झालेल्या व्यक्तीस कोणते प्रश्न विचारले जावेत . या विषयी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केडर या संस्थेने आतापर्यत १५०० पेक्षा जास्त वैफल्यग्रस्त रुग्णांना चिंता , नैराश्यातून बाहेर काढले आहे. त्यासाठी सिडर संस्थेने निराशेशिवाय जग निर्माण करण्याचा संकल्प केला असून सीडरच्या संशोधकांनी मनोवैज्ञानिक हस्तक्षेप करून चिंता निराशा कशी टाळता येईल याबाबतचा एक यशस्वी कार्यक्रम तयार केला आहे . याची देखील माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तरी मनोरुग्ण , वैफल्य ग्रस्त व्यक्ती पालक , मित्र व नातेवाईकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. लेट्स टॉक डिप्रेशन" या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून 9892003248 व्हाँट्स अप मेसेज करा किंवा 020- 29707248 या नंबरवर फोन करावा .
नैराश्य टाळता येऊ शकते लेट्स टाँक डिप्रेशन कार्यशाळेचेदि . ३ मार्च रोजी आयोजन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 28, 2019
Rating:
No comments: