Seo Services
Seo Services

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिका-यांनी कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत - उपजिल्हाधिकारी ज्योत्स्ना हिरेमुठ



बारामती : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने करण्यात आलेल्या मतदान प्रकीयेतील सुधारणांची ‍ माहिती घेवून क्षेत्रीय अधिका-यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योत्स्ना ‍हिरेमुठ यांनी आज केले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील ‍ बारामती लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिका-यांसाठी पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी  शिल्पा करमळकर,तहसिलदार हनुमंत पाटील, प्रशिक्षण अधिकारी निलेश खांडगे, रवींद्र रापतवार, नायब तहसिलदार आर.सी.पाटील, संजय पांढरपट्टे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी हिरेमुठ यांनी क्षेत्रीय अधिका-यांना निवडणूकविषयक  कामे  जबाबदारीने करावीत तसेच नवीन मार्गदर्शक सूचनांची माहिती घेवून त्याचे पालन करावे. अशा सूचना करुन  नवीन मशीनची हाताळणी योग्य पध्दतीने कशी करावी, क्षेत्रीय अधिका-यांचे अधिकार व कर्तव्ये त्याचबरोबर मतदानपूर्व मतदान केंद्राबाबत व मतदानपूर्व असुरक्षित मतदान केंद्राबाबत तसेच  मतदानाच्या पूर्वसंध्येला पार पाडावयाच्या जबाबदा-या, C-VIGIL ॲप, तसेच निवडणूकविषयक कामामध्ये क्षेत्रीय अधिका-यांनी घ्यावयाची खबरदारी  त्याचबरोब दिव्यांग मतदारांच्या सोईकरीता सर्वच क्षेत्रीय अधिका-यांनी त्यांच्या मतदान केंद्रामध्ये नोंदणी असलेल्या दिव्यांग मतदारांचा तपशील तपासून त्यांच्याकरीता रॅम्प व इतर आवश्यक सोई सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांना  मतदान करण्याकरीता प्राधान्य देण्यात यावे  याविषयांवर मार्गदर्शन करुन  क्षेत्रीय अधिका-यांच्या शंकेचे निरसन केले.

यावेळी ‍ निवडणूक प्रशिक्षण अधिका-यांकडून उपस्थित क्षेत्रीय अधिका-यांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन हाताळणीविषयक प्रशिक्षण देखील देण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिका-यांनी कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत - उपजिल्हाधिकारी ज्योत्स्ना हिरेमुठ आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिका-यांनी कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत - उपजिल्हाधिकारी ज्योत्स्ना हिरेमुठ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.