Seo Services
Seo Services

‘फ्लेवर्स ऑफ इंडिया’च्या अफलातून अविष्काराने पुणे स्मार्ट वीकला सुरवात



स्वस्तिक आवटे

पुणे- संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात फ्लेवर्स ऑफ इंडिया या एका भव्य संगीत व नृत्य अविष्काराने पुणे स्मार्ट वीक या सांस्कृतिक महोत्सवाची उत्साहवर्धक सुरुवात झाली. पुणेकर रसिकांच्या अभिरुचीस साजेशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या बहुप्रतीक्षित पुणे स्मार्ट वीक २०१९चे उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिर येथे महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले.
यावेळी महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. विशाल चोरडिया, आयुक्त श्री. सौरभ राव, घोले रोड प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. स्वाती लोखंडे, नगरसेविका नीला खाडे, ज्योत्स्ना एकबोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी अप्रतिम जोशपूर्ण नृत्य आणि संगीताचा नजराना असलेला "फ्लेवर्स ऑफ इंडिया" या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली. त्रिपुरा, मध्यप्रदेश, राजस्थान या तीन राज्यांतील शास्त्रीय, समकालीन आणि फ्युजन असे भारतीय वाद्य आणि नृत्य प्रकारांच्या विस्तृत श्रेणीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. दिलरुबा, मृदुंगम, तबला ही आणि इतर लोककलेची साधने, आणि लोक नृत्य, कथक आणि इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता.
कला सर्वांसाठी हे घोषवाक्य घेऊन साजरा केला जाणारा पुणे स्मार्ट वीक अद्वितीय, दृश्यमान असा अनुभव प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून आणि तंत्रज्ञानातून कलेचा संगम घडवणारा उपक्रम आहे. विविध विषयांवरील कार्यक्रम, प्रदर्शने, कार्यशाळा, स्पर्धा, वार्तालाप, मुलांचे खेळ आणि व्हिज्युअल आर्ट्स, डिझाइन, नृत्य आणि संगीत, चित्रपट, नाटक आणि इतर माध्यमांच्या क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ याद्वारे उपलब्ध होणार आहे.
सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या जंगली महाराज रोड, बाल गंधर्व, संभाजी पार्क, फर्ग्युसन कॉलेज रोड, राजा रवि वर्मा गॅलरी, घोल रोड, पोलिस परेड ग्राउंड इ. इत्यादी ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

‘फ्लेवर्स ऑफ इंडिया’च्या अफलातून अविष्काराने पुणे स्मार्ट वीकला सुरवात  ‘फ्लेवर्स ऑफ इंडिया’च्या अफलातून अविष्काराने पुणे स्मार्ट वीकला सुरवात Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.