Seo Services
Seo Services

एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी - डॉ.दिपक म्हैसेकर


विभागीय आयुक्तांनी साधला मतदारांशी संवाद

पुणे : मतदारांचे पत्ता बदल तसेच नवीन मतदारांची नोंदणी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन एकही मतदार  मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.

जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये असलेल्या हडपसर व पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयास आज विभागीय आयुक्तांनी भेट देवून लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदार यादीबाबत आढावा घेवून सूचना केल्या. 

मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी असलेल्या फॉर्म नं.६ बाबत मतदारांना योग्य रितीने मार्गदर्शन करावे. मतदारांचा पत्ता बदलला असल्यास त्याबाबत त्याची नोंद घेण्याबरोबरच एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्तांनी केल्या.

उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसिलदार कल्पना ढवळे, नायब तहसिलदार श्रीमती रोहिणी घाडगे, प्रशांत कसबे बैठकीस उपस्थित होते. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी नागरिकांशी संवाद साधून मतदार यादी बाबत त्यांना मार्गदर्शन केले.
एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी - डॉ.दिपक म्हैसेकर  एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही  याची दक्षता घ्यावी - डॉ.दिपक म्हैसेकर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.