Seo Services
Seo Services

अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये सिंधुदुर्ग वासीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन



स्वस्तिक आवटे (उप संपादक)

पिंपरीसिंधुदुर्गवासीय क्रिकेट स्पर्धा ही सातेरी सिद्धेश्वर वीर मराठा क्रिकेट ग्रुप आयोजित मर्यादित पाच षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 7 /2 /2019 रोजी पार पडली. यात संपूर्ण स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये यंग बॉईज संघ भोसरी विजेता आणि विश्वकर्मा स्पोर्ट निगडी हा संघ उपविजेता ठरला.

प्रथम पारितोषिक रोख रक्कम रु १३०००/- मा.शितलताई सावंत नगरसेवक पुणे म.न.पा.व श्री.मा.अजयदादा सावंत यांनी  कै. भारत जी बापूसाहेब सावंत (प्रथम महापौर पुणे म.न.पा.)यांच्या स्मरणार्थ देण्यात आले

द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये८००१श्री.मा. सुधाकर (दादा) धुरी "अध्यक्ष फेडरेशन ऑफ घरकुल" यांनी  कै.नारायण राम धुरी यांच्या स्मरणार्थ  देण्यात आले.
     
प्रथम आणि दुतीय सामनावीर, मालिकावीर, चषक हे पी.जी. हाऊस किपिंग चे मालक श्री.मा. प्रमोद वासुदेव गवस यांच्याकडून देण्यात आले.

संपूर्ण स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना सहभाग चिन्ह (चषक) श्री. मा संतोष लोंढे. नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांस कडून देण्यात आले.

प्रथम आणि द्वितीय फेरीतील प्रत्येक सामन्यातील सामनावीर चषक श्री.मा. संदीप सावंत (उद्योजक स्नेहा इंडस्ट्री) यांस कडून देण्यात आले ही स्पर्धा अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर, येथे पार पडली सलग चार वर्षे ही स्पर्धा मंडळाने आयोजित केली आहे. जे नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुण्यात वास्तव्य करत आहेत. यांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम मंडळाच्या माध्यमातून करत आहेत. तसेच स्वतमधील खेळाचे कौशल्य दाखवण्यासाठी एक छोटेसे व्यासपीठ तयार केले आहे. सामन्यातून जमा होणारी रक्कम मंडळ गरजू लोकांना देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करत आहे. श्री अशोक तेली आणि श्री. रणरणजित गवळकर यांचा अपघात झाला असता त्यांना वैयक्तिक मंडळातर्फे रुपये ५०००/- ची मदत केली.

 स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री. शैलेश गवस, श्री महेश धुरी, सुदान गवस,श्री किरण गवस, श्रीरामा गवस तसेच इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोक आणि चषक रूपात देणगी ची मदत केली आहे त्यांची मंडळाने मनःपूर्वक आभार मानले

या वेळी कार्यक्रमासाठी मान्यवर आणि पाहुणे म्हणून श्री. संतोष लोंढे, श्री. मा. अजय शेठ पातोडे,श्री. मा. सुधाकर धुरी,श्री. मा. सागर माळकर,श्री. मा. श्याम भाऊ लांडगे,श्री. मा. सुरेश गवस,श्री. मा. विलास गवस, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये सिंधुदुर्ग वासीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये सिंधुदुर्ग वासीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.