Seo Services
Seo Services

दहशतवादाला सरकार चोख प्रत्युत्तर देईल-पंतप्रधान

Image result for पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना देश चोख प्रत्युत्तर देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. श्रीनगरमध्ये उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक दहशतवाद्याचा आम्ही योग्य प्रकारे सामना करून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचा कणा मोडून काढू आणि सर्वसामर्थ्यांविषयी लढा देऊ.
दहशतवाद्यांविरोधात लढतांना आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शहीद नझीर अहमद वाणीला पंतप्रधानांनी अभिवादन केले. ते म्हणाले की, देशासाठी आणि शांततेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद नझीर अहमद वाणी आणि अन्य शूर जवानांना मी अभिवादन करतो. नझीर अहमद वाणीला अशोकचक्र देण्यात आले आहे. त्याच्या शौर्य आणि साहसाचा जम्मू काश्मीरच्या युवकांना आणि संपूर्ण देशाला देशासाठी जगण्याचा मार्ग दाखवला.
पंतप्रधानांनी नवनियुक्त सरपंचांशी संवाद साधला. इतक्या वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल त्यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, यामधून लोकशाहीवरचा त्यांचा विश्वास आणि राज्याच्या विकासाबाबतची आस्था दिसून येते.
राज्याच्या सर्वांगीण विकासाला आपले प्राधान्य असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, मी येथे 6000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्यासाठी आलो आहे. हे सर्व प्रकल्प श्रीनगरमधल्या लोकांचे जीवन सुखकर करणारे आहे.
पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. पुलवामामध्ये अवंतीपूरा येथे एम्सची पायाभरणी त्यांनी केली. राज्यातील आरोग्य सुविधा सुधारणे हा या मागचा उद्देश आहे. या एम्सला आयुष्मान भारत या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा केंद्राशी जोडण्यात येईल. आयुष्मान भारत योजनेचा आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांनी लाभ घेतला आहे.  जम्मू काश्मीरमधल्या 30 लाख लोकांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.
याप्रसंगी बांदीपोरा येथील पहिल्या ग्रामीण बीपीओचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले. यामुळे बांदीबोरा आणि शेजारील जिल्ह्यांमधील युवकांना रोजगारांच्या अधिक संधी उपलब्ध होतील. या भागातील युवकांसाठी बांदीपोरा ग्रामीण बीपीओमुळे संधींचे नवे दालन खुले होईल.
काश्मीर स्थलांतरीतांना जर पुन्हा काश्मीरमध्ये राहायचे असेल तर त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. काश्मीरी स्थलांतरीत कामगारांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 700 संक्रमण घरे बांधण्यात येत आहेत. विस्थापित काश्मीरांना 3000 पदांवर नियुक्त करण्यासाठीचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील विविध भागांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत विविध प्रकल्पांचा बटन दाबून डिजिटल शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. जम्मू-काश्मीरमध्ये इश्तवाद, कुपवाडा अणि बारामुल्ला येथे तीन आदर्श पदवी महाविद्यालयांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. तसेच जम्मू विद्यापीठात उद्यमशीलता, नव संशोधन आणि करिअर केंद्रांची पायाभरणी त्यांनी केली.
400 केव्ही डी/सी जालंदर-सांबा-राजौरी-शोपियान-अमरगड (सोपूर) पारेषण मार्गाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले. या प्रकल्पामुळे जम्मू आणि कश्मीर मध्ये ग्रीड जोडणीत वाढ झाली आहे.
उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारमध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्‌घाटन दिल्लीतील विज्ञान भवनातून करण्यात आले आहे. मात्र, रालोआ सरकारने विविध प्रांतांमध्ये प्रकल्पांचे उद्‌धाटन केले आहे. ते म्हणाले की, आमच्या सरकारने झारखंडमधून आयुष्मान भारत योजना, उत्तर प्रदेशातून उज्ज्वला योजना, पश्चिम बंगालमधून पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, तामिळनाडूमधून हातमाग अभियान तर हरियाणामधून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा शुभारंभ केला.
सप्टेंबर 2018 पर्यंत राज्याला उघड्यावरील शौचापासून मुक्त केल्याबद्दल त्यांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे आभिनदंन केले.
भारतामध्ये नवसंशोधन, इनक्युबेशन आणि स्टार्ट अपचे नवीन तंत्रज्ञान आले आहे. स्टार्ट अप अभियानाला गती मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले. तीन-चार वर्षातच भारतात सुमारे 15 हजार स्टार्ट अप कार्यरत झाली असून यापैकी निम्मे स्टार्ट अप पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये आहेत.
गंदेरबालमधील सिफोरा येथे बहुउद्देशीय इन डोअर, क्रीडा सुविधेचे उद्‌धाटन पंतप्रधानांनी केले. या सुविधेमुळे युवकांना इन डोअर खेळ खेळण्याची संधी मिळेल. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी तसेच क्रीडा सुविधा सुधारण्यासाठी खेलो इंडिया अभियानात जम्मू-काश्मीरच्या सर्व 22  जिल्ह्यांना सामावून घेण्यात आले आहे, असे तेम्हणाले.
पंतप्रधानांनी दल सरोवरालाही भेट दिली आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली. पंतप्रधानांचा हा एक दिवसाचा दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी लेह, जम्मू आणि श्रीनगर या तीनही भागांना भेट दिली.
http://pib.nic.in/PressReleseDetail.aspx?PRID=1562293&RegID=1&LID=9
दहशतवादाला सरकार चोख प्रत्युत्तर देईल-पंतप्रधान दहशतवादाला सरकार चोख प्रत्युत्तर देईल-पंतप्रधान Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 04, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.