‘कला सर्वांसाठी’ : पुणेकर रसिक प्रेक्षकांसाठी विविध
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
पुणे :- महाराष्ट्राची
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात प्रथमच पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट
कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने ‘पुणे स्मार्ट वीक' हा आगळावेगळा सांस्कृतिक सप्ताह
आयोजित करण्यात येत आहे. ‘कला सर्वांसाठी’ हे स्मार्ट वीकचे घोषवाक्य असून, यामध्ये १४ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी
२०१९ या दरम्यान अकरा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार
आहे.
पुण्यातील
वैविध्यपूर्ण असा एक सांस्कृतिक खजिन्याचा स्रोत सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा
हा एक प्रयत्न आहे. या पुणे स्मार्ट वीकच्या माध्यमातून सांस्कृतिक, कलात्मक आणि
वैचारिक देवाण-घेवाण व्हावी आणि शहरातील कलेच्या उपासनेला पाठबळ मिळावे हा या
आयोजनामागील उद्देश आहे.
पुणे
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने अकरा
दिवसांमध्ये १) व्हिज्युअल आर्ट्स, २) चित्रपट आणि नाटक, ३) नृत्य, प्रदर्शन कला
तथा परफॉर्मिंग आर्ट्स, संगीत, ४) कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके, प्रदर्शने, ५)
चर्चासत्रे, ६) साहित्य, कविता, ७) बाल गट, ८) खवय्येगिरी/ खाद्य अशा आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. प्रामुख्याने जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, घोले
रोड, बालंगंधर्व रंगमंदिर आणि कलादालन, तसेच संभाजी उद्यान या ठिकाणी विविध
सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
पुणे
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, "सांस्कृतिक राजधानी म्हणून असलेली पुण्याची ओळख आणि
शहराला लाभलेला वारसा जपत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सर्व पुणेकर रसिक
प्रेक्षकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा विनाशुल्क लाभ घेता यावा यासाठी पुणे
स्मार्ट वीकचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे रसिकांना ही एक पर्वणी लाभणार असून,
कला क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे."
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन
रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, संभाजी
उद्यान या
ठिकाणी पुढील प्रमाणे संभाव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजांचे
अनावरण,
स्ट्रीट आर्ट फेस्टिवल,
कला सादरीकरण डिजिटल किऑस्क,
लघूपट महोत्सव,
स्टँड अप कॉमेडी, नाटक,
फ्युजन नृत्य,
कार्यशाळा,
खाद्य महोत्सव,
स्थानिक कला, कविता वाचन, पुस्तक वाचन क्राफ्ट व्हिलेज हस्तकला, बूथ्स
पपेट शो, ग्रामीण कलाकारांना
प्रोत्साहन, ओपन एअर बालचित्रपट महोत्सव,
प्रदर्शन, कार्यशाळा,
ओपन एअर चित्रपटगृह
कला शाखा, डिझाईन व
वास्तुरचनाशास्त्राच्या कॉलेजांसाठी स्पर्धा
स्मार्ट पुण्यासाठी मेसेज वॉल
मोक्याच्या जागी चौकांमध्ये कलात्मक
रचनांची उभारणी (आर्ट इंस्टॉलेशन)
स्मार्ट इंटरऍक्टिव बूथ, किऑस्क
बँड वॉर कॉम्पिटिशन,
फोटो बूथ- हॅशटॅग
स्मार्ट पुणे
पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने ‘पुणे स्मार्ट वीक’चे आयोजन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 04, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 04, 2019
Rating:

No comments: