Seo Services
Seo Services

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील एक्सरे विभागात महिला रुग्ण असुरक्षीत


जागृत नागरिक महासंघाची महिला टेक्निशियनची डॉ पद्माकर पंडित यांच्यासकडे मागणी

स्वस्तिक आवटे (उप संपादक)

पिंपरी : पि.चि...पा.च्या रुग्णालयातील एक्सरे विभागात महिला रुग्णांना सुरक्षितता मिळत नाही. तेथे महिला एक्सरे टेक्निशियन नाहीत अशी तक्रार संस्थेकडे प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार X RAY विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन तक्रारींची शहानिशा केली, आणि मंगळवार सकाळी १० वा. संस्थेच्या शिष्टमंडळाने वाय.सी.एम.हॉस्पिटलकचे उपअधीक्षक डॉ. जाधव यांची प्रत्यक्ष भेट घेतली व एक्सरे विभागातील महिला रुग्णांच्या असुरक्षितते बाबत जाब विचारला.
एक्सरे विभागात T.B संदर्भात एक्सरे घेताना महिलांना कमरेवरच्या भागातील सर्व कपडे काढून अँप्रान घालावे लागते व नंतर एक्सरे घेतला जातो. यासाठी बंद खोलीची व्यवस्था आहे. परंतु अँप्रान बांधण्यासाठी तेथे कोणी महिला कर्मचारी उपलब्ध नाही, या विभागात सर्व पुरुष टेक्निशियन आहेत. त्यामुळे सदर महिला रुग्णाला कोणतीही सुरक्षितता/संरक्षण मिळत नाही. याशिवाय एक्सरे घेताना या खोलीत बाहेरचे रुग्ण दरवाजा ढकलुन आत डोकावत असतात .विशेष म्हणजे येथे वॉर्ड बॉय/स्टाफच्या व्यक्ती आपापल्या पेशन्टला घेऊन सरळ आत घुसतात. ही अत्यं गंभीर बाब असल्याचे शिष्टमंडळाने डॉ जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले.  डॉ. जाधव यांनी महिला रुग्णांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मान्य करून संपुर्ण एक्सरे विभागाची कानउघडणी करत, तात्काळ विभागाला एक सहाय्यक महिला रुग्णांच्या मदतीला व एक गार्ड दरवाज्यात ठेवण्याचा आदेश दिला. तसेच रुबीएलकेअर चा इंग्रजी मध्ये लावलेला रुग्णसेवांबाबतचा दर फलक मराठी मध्ये लावावा, या संस्थेच्या मागणीला तात्काळ संमती देऊन सदरचा फलक दोन दिवसात मराठीत लावण्यात येईल असे रुबीएलकेअरचे प्रमुख डॉ. कनोज यांच्यामार्फत सांगण्यात आले. शिवाय वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना (ज्या मध्ये गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतात) औषध आणि टोकन घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. रुग्णांना यात्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून जिल्हा रुग्णालय औंध यांनी राबवलेल्या कडापा बाकडे व्यवस्थेच्या धर्तीवर वय.सी.एम.मध्ये देखील अशीच व्यवस्था करावी, यासूचनेला सुद्धा डॉ. जाधव यांनी मान्यता देऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील एक्सरे विभागात महिला रुग्ण असुरक्षीत यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील एक्सरे विभागात महिला रुग्ण असुरक्षीत Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.