क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 122 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली
पिंपरी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 122 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्यावतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
महात्मा फुले स्मारक परिसरात विविध संघटनांच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. प्रथमतः महात्मा फुले पुतळ्यास मा. वसंतराव लोंढे उर्फ नाना व प्रथम महिला महापौर अनिताताई फरांदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे. मा. नगरसेविका भारतीताई फरांदे, नगरसेविका रेखा दर्शले, कवीता खराडे, क्षमा धाडगे, नंदा करे, सौ. मंगलाताई कांबळे, सरोजिनी धांडगे आदि महिलांनी पुष्पहार अर्पण केला.
या प्रसंगी महापौर मा. राहुलदादा जाधव. मा. वसंतराव लोंढे, मा. प्रतापराव गुरव, मा. राजेंद्र राजापुरे, मा. काळूराम उर्फ आण्णा गायकवाड, मा. रघुनाथ वाघ, मा. देवेंद्र तायडे, समता परिषदेचे अध्यक्ष अँड. चंद्रशेखर भुजबळ, मा. सिद्धीकी शेख, मा. गिरीश वाघमारे, मा. अक्षय कळमकर, मा. आनंदराव कुदळे, मा. हनुमंत लोंढे, साप्ताहिक एकच ध्येयचे संपादक मा. महेश आनंदा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर मा. राहुलदादा जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याप्रमाणे महिलांच्या उन्नतीसाठी महापालिकेच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित उत्सवासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आवर्जून सांगितले.
नाना लोंढे, भारतीताई फरांदे, प्रतापराव गुरव, गिरीजा कुदळे, देवेंद्र तायडे, गिरीश वाघमारे, सिद्धीकी शेख, आनंदा कुदळे, रघुनाथ वाघ, सौ. काबंळे, सौ. माळी आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश गायकवाड यांनी केले तर आभार समता परिषदेचे सचिव मा. राजेश करपे यांनी मानले. सूत्रसंचालन हणमंत माळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता परिषदेचे अध्यक्ष अँड. चंद्रशेखर भुजबळ, माळी महासंघाचे विश्वस्त आण्णा गायकवाड, ओ बी सी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदराव कुदळे व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 122 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 10, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 10, 2019
Rating:



No comments: