नवी दिल्ली : देशभरात विविध अंमलबजावणी संस्थांकडून 25 मार्च 2019 पर्यंत सुमारे 540 कोटी रुपये मूल्याची एकूण जप्ती करण्यात आली. यात रोकड, मद्य, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आणि इतर भेट वस्तुंचा समावेश आहे.
एकूण रोकड जप्त – 143.47 कोटी रुपये
एकूण मद्य जप्त – 89.64 कोटी रुपये मूल्याचे
एकूण अंमली पदार्थ जप्त – 131.75 कोटी रुपये मूल्याचे
एकूण मौल्यवान धातू (सोने, इत्यादी) जप्त – 162.93 कोटी रुपये मूल्याचे
एकूण भेट वस्तु जप्त – 12.202 कोटी रुपये मूल्याचे
सर्वाधिक मूल्याची जप्ती तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यातून झाली आहे.
आंध्र प्रदेशात 103.4 कोटी रुपये मूल्याची, तामिळनाडूत 107.24 कोटी रुपये मूल्याची, तर उत्तर प्रदेशातून 104.53 कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एकूण 19.11 कोटी रुपये मूल्याची जप्ती झाली आहे. यात रोकड 5.90 कोटी रुपये, 9.71 कोटी रुपये मूल्याचे 12.03 लाख लिटर मद्य, 3.11 कोटी रुपये मूल्याचे 36.6 किलो अंमली पदार्थ, 48 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान धातू यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक 2019 - 25 मार्च 2019 पर्यंतच्या जप्तीचा अहवाल
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 26, 2019
Rating:

No comments: