2 हजार 500 कोटींपेक्षा जास्त तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने खासगी क्षेत्रातील सात मातब्बर कंपन्यांना सोबत घेऊन शिवशाही बसगाड्यांसाठी करार केला होता. मात्र एसटी महामंडळासोबत झालेल्या करारातील जाचक अटींमुळे या कंपन्यांना आता या बसगाड्या चालवणे परवडत नसल्याने काही खासगी कंपन्यांनी शिवशाही प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन लग्न सराईत एसटी महामंडळाची डोके दुःखी वाढली आहे.
राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शिवशाही बसगाड्या म्हणून महामंडळाच्या ताफ्यात मोठा गाजावाजा करत आणल्या होत्या. खासगी वाहतूक सेवेला टक्कर देण्यासाठी महामंडळाने 1 हजार 23 शिवशाही सुरू केल्या. मात्र खासगी कंत्राटदारांना शिवशाही चालवणे सध्या जड झाले आहे. महामंडळाने सोबत झालेल्या कराराच्या जाचक अटींमुळे खासगी कंपन्यांना सतत तोटा होत असल्यामुळे त्यांनी एसटीसोबत झालेल्या करार संंपुष्टात आणण्यासाठी एसटी महामंडळाला रितसर पत्र पाठवले आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली असून, ऐन लग्न सराईत आणि उन्हाळ्याचा सुट्टीमुळे या खासगी शिवशाहीचे कंत्राट रद्द होणार असल्यामुळे एसटी महामंडळाची चांगली गैरसोय झाली आहे. अत्याधुनिक आणि वातानुकूलित शिवशाहीत एलईडी स्क्रीन (टीव्ही), मोफत वायफाय, चार्जिंग पॉईट, पुश बॅक आसन आणि अग्निशमन यंत्रणा असणे अनिवार्य आहे.
मात्र सुरूवातीला शिवशाहीमध्ये या सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने शिवशाहीमध्ये या सुविधा बंद अवस्थेत असल्याने प्रवांशाकडून यासंबंधी मोठ्या प्रमाणत तक्रारी एसटी महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या दोषी कंपन्यांनी महामंडळाच्या कारवाईला समोर जावे लागले. त्यामुळे करारातील जाचक अटी आणि अशा कारवाईमुळे खासगी शिवशाहीला दंड भरावा लागत असल्याने काही खासगी शिवशाही कंपन्यांनी शिवशाही प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे कारण ?
भाडेतत्वावर चालवण्यात येणार्या शिवशाहीला फक्त चालक खासगी कंपनीचा असतो. वाहक आणि डिझेलही एसटी महामंडळ पुरवते. १८ रुपये प्रति किलोमीटर एवढी रक्कम खासगी शिवशाही कंपनीला एसटी महामंडळाकडून देण्यात येते. दररोज शिवशाही ३५० किलोमीटर चालावी. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त चालत असल्याने भाडेतत्वावर देणार्या कंपनीला शिवशाहीचे मेन्टन्स परवडत नाही. त्याचबरोबर करारामध्ये असल्या अटीमुळे खासगी शिवशाही तेवढी सुविधा द्यावे लागते. त्यामुळे खासगी शिवशाही काही कंपन्यांनी कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे.
शिवशाही संख्या
एसटी महामंडळाच्या बसगाड्या - 500
भाडेतत्वार घेतलेल्या - 523
एकूण - 1023
खासगी शिवशाहीच्या मातब्बर कंपन्यांना
1 ऐरोन टूरर्स
2 भागीरती
3 रेनबो
4 बाफना
5 प्रसन्ना पर्पल
6 हरहम
7 श्री कृपा सव्हिसेस
जाचक अटींमुळे शिवशाही बंद होण्याचा मार्गावर
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 26, 2019
Rating:

No comments: