नवी दिल्ली : आफ्रिका-भारत फिल्ड ट्रेनिंग एक्सर साईज 2019 अंतर्गत मानव आणि यंत्राद्वारे सुरुंग निकामी करणे, आयईडी निकामी करणे याच्याशी संबंधित प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. 18 मार्चपासून पुण्यात सुरु झालेल्या सरावात भारत आणि बोटस्वाना, इजिप्त, घाना, केनिया, मोझांबिक, नामिबिया, नायजेरिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, सुदान, टांझानिया, युगांडा, झांबिया आणि झिंम्बाब्वे यासह 17 आफ्रिकी देश सहभागी झाले आहेत. रवांडा, काँगो आणि मादागास्कर मधले तीन निरिक्षकही यात सहभागी झाले आहेत.
आफ्रिका-भारत फिल्ड ट्रेनिंग सराव-2019
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 22, 2019
Rating:
No comments: