Seo Services
Seo Services

व्हीव्हीपॅट स्लीप मोजणीसंदर्भातला भारतीय सांख्यिकी संस्थेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर

Related image


नवी दिल्लीव्हीव्हीपॅट स्लीप अर्थात मतदान पोचपावती मोजणीसंदर्भातल्या नमून्याबाबत भारतीय सांख्यिकी संस्थेने आपला अहवाल आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अशोक लवासा, सुशील चंद्रा या निवडणूक आयुक्तांना सादर केला. भारतीय सांख्यिकी संस्थेच्या दिल्ली केंद्राचे प्रमुख प्रोफेसर अभय भट्ट यांनी हा अहवाल सादर केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रानी दर्शवलेल्या मतांच्या एकूण आकड्या बरोबर व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी करण्यासंदर्भात शास्त्रोक्त परीक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी आयोगाने ही बाब सांख्यिकी संस्थेकडे सोपवली होती. अशा पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती.
भारतीय सांख्यिकी संस्था ही आकडेवारीसंदर्भात संशोधन, उपयोग, सर्वेक्षण पद्धती यासंदर्भात देशातली नामांकित संस्था आहे. निवडणूक आयोगाने सोपवलेल्या बाबीसाठी भट्ट यांच्यासह आणखी सदस्यांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीने, आपला अहवाल सादर करण्यापूर्वी सांख्यिकी क्षेत्रातल्या इतर तज्ञांशी व्यापक चर्चा केली. तज्ञ समितीच्या अहवालाचे आता निवडणूक आयोगाकडून परीक्षण केले जाईल, त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
व्हीव्हीपॅट स्लीप मोजणीसंदर्भातला भारतीय सांख्यिकी संस्थेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर व्हीव्हीपॅट स्लीप मोजणीसंदर्भातला भारतीय सांख्यिकी संस्थेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 22, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.