Seo Services
Seo Services

25 मार्च  रोजी डाक अदालतचे आयोजन

Image result for डाक अदालत


नागपूर : विदर्भ क्षेत्रातील डाक सेवेबाबत सहा आठवडयापेक्षा जास्त काळ अनुत्तरित असलेल्या तक्रारींचे निवारण  जलदरित्या होण्यासाठी  25 मार्च   सोमवार  रोजी    सकाळी 11वाजता,  पोस्टमास्टर जनरल, नागपूर क्षेत्र, नागपूर – 10 यांच्या कार्यालयात डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.   
           
सदर  डाक अदालत मध्ये, फक्त ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यामधे झाले नाही अशाच तक्रारीचे निवारण करण्यात येईल.विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू, पार्सल, काउंटर सेवा, बचत बँक व मनी ऑर्डर याबाबत उद्भवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. आपले आवेदन पत्र (दोन प्रतीसह )  श्री.  महंती संतोष कुमार नरहरी, सहाय्यक संचालक, डाक सेवा- 2 आणि सचिव, डाक अदालत,  पोस्टमास्टर जनरल कार्यालय, विदर्भ क्षेत्र, शंकरनगर डाकघर, नागपूर-10  यांच्या नावावर  डाकेने पाठवावित किवा प्रत्यक्ष सबंधित अधिकारी यांचेकडे   15  मार्च 2019 पर्यंत आणून द्यावीत.  
           
तक्रारीमध्ये तक्रारकर्त्यांनी स्वत:चे नाव व पत्ता तसेच  दूरध्वनी क्रमांक आणि प्रारंभी केलेल्या तक्रारी बद्दल ज्या अधिका-याकडे  त्यांनी तक्रार नोंदवली असेल त्यांचे नाव व हुद्दा यांचा तपशील तसेच तक्रार केल्याची  तारीख यासोबत मूळ तक्रारीची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. आपला अर्ज वरील उल्लेख केलेल्या कागद-पत्रासोबत सबंधित अधिकारी यांच्याकडे    15  मार्च 2019 पर्यंत किवा त्या अगोदर पाठवावेत. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल  या डाक अदालतीमध्ये घेतली जाणार नाही, अशी माहिती  पोस्टमास्टर जनरल ,नागपूर क्षेत्र, नागपूर यांनी  दिली आहे.  
25 मार्च  रोजी डाक अदालतचे आयोजन 25 मार्च  रोजी डाक अदालतचे आयोजन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 03, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.