Seo Services
Seo Services

एसटीचे यात्री निवास वारकरी संप्रदायाला समर्पित- दिवाकर रावते यांची घोषणा



पंढरपूर : संताचे व वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्या पंढरीत एसटी महामंडळाच्यावतीने ३३ कोटी रुपये खर्च करुन भव्य यात्री निवास व सुसज्ज असे बसस्थानक बांधण्यात येणार आहे. हे वारकरी संप्रदायाच्या प्रथापरंपरेला समर्पित करीत असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

एसटी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी श्री. रावते बोलत होते. यावेळी संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदाससंत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर, माजी आमदार सुधाकर परिचारकएसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित सिंह देओलएसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंतमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीउपमहाव्यवस्थापक राहुल तोरोसुहास जाधवविभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.


श्री.रावते म्हणालेवारकरी संप्रदाय हा प्रमुख भक्तीचा मार्ग असून या मार्गाचे आराध्य दैवत पांडुरंग हा अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आहे. वारकरी हा महाराष्ट्राचे संस्कार व संस्कृती जपणारा आहे. या संस्काराच्या बळावर पंढरीत येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. येणाऱ्या वारकरी व भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्री निवासाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाने विविध सवलतधारक प्रवाशांना आधारकार्डसंलग्न स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय घेतला असून या स्मार्टकार्डचे औपचारिक वाटप तसेच एसटीच्या विनावातानुकुलित शयनयान बसचे उदघाटन श्री.रावते यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


यावेळी ह.भ.प. माधव महाराज नामदासह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि ह.भ.प. संजय महाराज देहूकर आदी महाराजांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकरमहादेव महाराज शिवणीकरतनपुरे महाराज आदींसह राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटीचे यात्री निवास वारकरी संप्रदायाला समर्पित- दिवाकर रावते यांची घोषणा एसटीचे यात्री निवास वारकरी संप्रदायाला समर्पित- दिवाकर रावते यांची घोषणा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 04, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.