Seo Services
Seo Services

छाननीमध्ये पहिल्या टप्प्यातील १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध



मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांची काल छाननी झाली. छाननीमध्ये 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीअंती लोकसभा मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :
वर्धा लोकसभा मतदारसंघात 16, रामटेक मतदारसंघात 21, नागपूर मतदारसंघात 33, भंडारा-गोंदिया मतदारसंघात 23, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 6, चंद्रपूर मतदारसंघात 17 आणि यवतमाळ- वाशिम मतदारसंघात31 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत उद्या दि. 28 मार्च 2019 रोजी दुपारी 3वाजेपर्यंत असून त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
छाननीमध्ये पहिल्या टप्प्यातील १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध छाननीमध्ये पहिल्या टप्प्यातील १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 28, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.