
मुंबई : मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातील सर्व सभासदांसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांच्या वतीने मंत्रालयात आज व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
मतदारांनी आपले मत ज्या कुठल्या उमेदवाराला दिले आहे, त्या उमेदवाराचे नाव, त्याचा पक्ष तसेच त्याचे चिन्ह 7 सेकंदापर्यंत व्हीव्हीपॅट मशीनच्या स्क्रीनवर फक्त मतदान करणाऱ्या मतदाराला बघता येणार आहे. ज्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला केलेले मतदान झाले की नाही याची खात्री या मशीनमुळे संबंधित मतदाराला करता येणार आहे. यामध्ये मतदाराचा अनुक्रमांक, नाव याची कुठलीही माहिती या स्क्रीनवर दिसणार नाही. मतदाराने मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर कंट्रोल युनिट हे मतदान केंद्र अध्यक्ष यांच्याकडे तर व्हीव्हीपॅट मशीन व बॅलेट युनिट हे मतदार ज्या ठिकाणी मतदान करणार आहे तिथे ठेवले जाणार आहे. 1 हजार 400 मतदार क्षमतेचे हे व्हीव्हीपॅट मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात येणार आहे.
प्रदिप केदार यांच्या नेतृत्वाखालील जितेंद्र भगत, संजय रेवाळे, सखाराम गोडे,नंदन मोरे, सिरसाट या पथकाने प्रात्यक्षिक सादर केले.
मंत्रालयात 'व्हीव्हीपॅट'चे प्रात्यक्षिक
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 27, 2019
Rating:

No comments: