Seo Services
Seo Services

राजपत्रित अधिकारी महासंघाने दिले महिलांविषयी मागण्यांचे निवेदन


पुणे : महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय यांना  देण्यासाठीचे  निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी  महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय  समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांना देण्यात आले.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा समितीचे सरचिटणीस- इंजिनियर विनायक लहाडे, महिला उपाध्यक्ष- शितल सेवतकर, महिला सहसचिव - सविता नलावडे, महासंघाचे कोषाध्यक्ष- मो.द.साळवी, सचिव- राजेंद्र सरग, दुर्गा मंचच्या सचिव- वृषाली पाटील, संघटक- अशोक मोहिते, माणिकराव शेळके, अभियंता श्रेया पाटील, अंजुम पठाण, मिरा गुथालिया आदी उपस्थित होते.

यावेळी विशाखा समितीच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हा/विभागस्तरावर विहित कालावधीत काटेकोरपणे घेण्याचे निर्देश द्यावेत, महिलांना बदलीच्या ठिकाणी शासकीय निवासस्थाने व विश्रांतीगृहे प्राधान्याने मिळावीत, महिलांना त्यांच्या बदली पसंतीक्रमानुसार त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करुन प्राधान्य देण्यात यावे, महिला कर्मचारी हा विचार करताना विवाहीत, विधवा यासोबतच एकल पालक (Single parent)आणि अविवाहित महिला यांचाही विचार करण्यात यावा, एकल पालक व विधवा यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण व आजारपणासाठी विनंती बदलीची तरतूद असावी, अविवाहित कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांच्या देखभालीसाठी व स्वत:च्या आजारपणासाठी विनंती बदलीची तरतूद करण्यात यावी, खातेवाटप करताना महिला अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती देण्याबाबतच्या शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, महिलांना नवीन नियुक्ती, पदोन्नती, बदली होताना पसंतीने महसूल विभाग/संवर्ग वाटप व्हावेत, मुलांचे संगोपन व शिक्षणाचा विचार करुन महिलांना त्यांच्या कुटुंबापासून जवळपास बदलीचे ठिकाण द्यावे, महिला धोरणानुसार ज्या महिलांच्या बदल्या झाल्या नसतील वा प्रलंबित असतील, त्यांच्या बाबतीतही सदरचे धोरण लागू करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली.

राजपत्रित अधिकारी महासंघाने दिले महिलांविषयी मागण्यांचे निवेदन राजपत्रित अधिकारी महासंघाने दिले महिलांविषयी मागण्यांचे निवेदन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 08, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.