Seo Services
Seo Services

भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई






देहू : ''संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,'' असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला.

संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या पार्श्वभूमीवर एक लाख भाविक येतात. भाविकांना सोयी सुविधा देताना येणाऱ्या अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार गीता गायकवाड, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, पोलिस निरीक्षक प्रकाश धस, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त अभिजित मोरे, विठ्ठल मोरे, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते आदी उपस्थित होते.

बारवकर म्हणाले, ''यात्रा काळात रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मांढरदेवीसारख्या घटना होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. ''सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गावातील रस्ते बीजेपूर्वी करण्यात येणार आहेत. जीवन प्राधिकरणाच्या वतीने चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पीएमपीसाठी गावाबाहेर बसस्थानक उभारण्यात येणार आहे. १८ मार्चला इंद्रायणी नदीत धरणातून चारशे क्‍युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने चोवीस तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. यात्रा काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.