जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांसोबत मॅराथॉन बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आज झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, राजूरा उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आर्णी येथील उपविभागीय अधिकारी एस.भुनेश्वरी, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी संपत खलाटे व सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी आयएएस अधिकारी श्री. दीपांकर सिन्हा निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्यांचा मोबाईल क्र. ९४२३९६२८३१ व ९३०९९४२८१५ असून सी.एस.टी.पी.एस. चंद्रपूर येथील हिराई व्हीआयपी गेस्टहाऊस मध्ये त्यांचे वास्तव्य राहणार आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक निरीक्षक यांना तक्रारी निवेदन द्यायचे असल्यास सायंकाळी ४.३० ते ६.०० या वेळात देता येणार आहे. आज स्वत: त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची ओळख करुन घेत त्यांच्याकडे असणाऱ्या कामाचा आढावा घेतला.
याशिवाय विविध पक्षांच्या उमेदवारांसोबत पक्षचिन्ह वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला. प्रशासन आदर्श आचार संहितेमध्ये येणारी सर्वतोपरी मदत करेल. उमेदवारांनी देखील कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होणार नाही. याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभा निवडणुकीसाठीच्या यंत्रणेचा निरीक्षकांकडून आढावा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 30, 2019
Rating:
No comments: