Seo Services
Seo Services

दहा टक्के मतदान केंद्रावर होणार ‘वेब कास्टींग’


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

यवतमाळ : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अधिक पारदर्शीपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर वेब कास्टींग’ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील दहा टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टींग’ करण्यात येणार आहेअसे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी (14- यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघ) अजय गुल्हाने यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मासहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरीअपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकरउपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

वेब कास्टींग करण्यात येणारे मतदान केंद्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्वरीत ठरवावेअशा सूचना देऊन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणालेशक्यतोवर संवेदनशील किंवा यापूर्वी भुतकाळात अप्रिय घटना घडलेले मतदान केंद्र वेब कास्टींगकरिता निवडा. त्यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य घ्या. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रोटोकॉल सांभाळणे गरजेचे आहे. या मशीन सुरक्षित जागी ठेवा. तेथे सुरक्षारक्षक ठेवणे आवश्यक आहेअसे त्यांनी सांगितले.


निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर रॅम्पविद्युत व्यवस्थाशेडपिण्याचे पाणीमेडीकल कीटव्हीलचेअर आदी सुविधांबाबत पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घ्याव्या. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विविध परवानगीकरिता एक खिडकी योजना अंमलात आणावी. त्यांना त्वरीत परवानगी देणे महत्त्वाचे आहेअसेही जिल्हाधिकारी म्हणाले.


यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची स्थितीप्रशिक्षणाची जागा व वेळस्ट्राँग रुमएसएसटीला नियमित भेटीखर्चाचे नियंत्रण आदी बाबींचा आढावा घेतला. बैठकीला संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीखर्च नियंत्रक टीमचे अधिकारी आदी उपस्थित होते.


14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 2019 रोजी होणार असून या मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 2181 आहे.
दहा टक्के मतदान केंद्रावर होणार ‘वेब कास्टींग’ दहा टक्के मतदान केंद्रावर होणार ‘वेब कास्टींग’ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 30, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.