Seo Services
Seo Services

आचारसंहिता कालावधीत राज्यात ४ हजार ४२८ गुन्हे दाखल


मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात 4 हजार428 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. निवडणूक प्रशासनाकडून राज्यात काटेकोर पद्धतीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 11 मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभागउत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. परवाना नसलेली 328 शस्त्रे, 81 काडतुसे आणि 8 हजार 302 जिलेटीन आदी  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 797 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. 131प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 46 शस्त्रपरवाने  रद्द करण्यात आले आहेत.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 63हजार 608 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 16 हजार 380 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 6 हजार228 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 19 हजार 157 प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली असून 21 हजार 264 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.
आचारसंहिता कालावधीत राज्यात ४ हजार ४२८ गुन्हे दाखल आचारसंहिता कालावधीत राज्यात ४ हजार ४२८ गुन्हे दाखल Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 27, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.