पुणे : पुण्यात उमेदवारी जाहीर करून भा.ज.पा.ने प्रचारात आघाडी घेतली असली तरी प्रचाराच्या पहिल्याच सभेचा फज्जा उडाल्याचे पुण्यात पाहावयास मिळाले. त्यामुळे संयोजकांची बरीच पळापळ झाली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे प्रमुख पाहुणे होते. त्यांचे भाषण संपण्यापूर्वीच अनेकांनी काढता पाय घेतला.पुण्यातील भा.ज.पा.चे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचाराचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथे फोडण्यात आला. या सभेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. या सभेदरम्यान महायुतीमधील घटक पक्षाच्या सात नेत्यांची खूप वेळ चाललेल्या भाषणामुळे सभा ठिकाणी असलेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी प्रकाश जावडेकर यांच्या भाषणापूर्वी बाहेर पडणे पसंत केले. नागरिक बाहेर जाताना पाहून आयोजकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, भा.ज.पा. शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना आमदार नीलमताई गोऱ्हे तसेच भा.ज.पा.चे शहरातील आमदार आणि पदाधिकारी सभेला उपस्थित होते. सभा सहाला सुरू झाली. सव्वा नऊ वाजता संपली. अनेक रटाळ भाषणे झाली. सभेला बालेवाडी भागातून आलेल्या महिला घरी जाण्यासाठी उठू लागल्या आणि खुर्च्या रिकाम्या झाल्या.
गिरीश बापट यांच्या पहिल्याच सभेत झटका! जावडेकरांच्या भाषणाआधीच निम्म्या खुर्च्या रिकाम्या....
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 27, 2019
Rating:

No comments: