Seo Services
Seo Services

बांग्लादेशच्या युवा संसद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट


मुंबई : बांग्लादेश संसदेच्या १७ युवा  सदस्य तसेच राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. उद्योग क्षेत्रात हे राज्य सर्वात अग्रेसर आहे. बांग्लादेशातील अनेक विद्यार्थी पुणे येथे उच्च शिक्षणासाठी येतात. त्यामुळे व्यापार संबंध वाढवितानाच बांग्लादेशातील विद्यापीठे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये आदानप्रदान वाढल्यास उभयपक्षी संबंध अधिक दृढ होतीलअसा विश्वास शिष्टमंडळाचे प्रमुखखासदार नहीम रझ्झाक यांनी व्यक्त केला.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून हे शहर नागरिकांसाठी व विशेषतः महिलांसाठी सुरक्षित असल्याचे पाहून आम्ही प्रभावित झालोअशी कबुली शिष्टमंडळाच्या सदस्यांनी दिली.

बांग्लादेशने गेल्या दशकात केलेली सामाजिक-आर्थिक प्रगती लक्षणीय आहे. महाराष्ट्र व बांग्लादेशातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थीशिक्षक तसेच सांस्कृतिक देवाण- घेवाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास आपण कुलपती या नात्याने सर्वतोपरी सहकार्य  करू,असे आश्वासन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी संसदीय शिष्टमंडळाला दिले.

भारत आणि बांग्लादेश जमीननदी,समुद्र व संस्कृतीने एकमेकांशी जोडले असून गरीबीविकासाचा अभाव व अनारोग्य ही उभय देशांपुढील आव्हाने आहेत. यास्तव उभय देशांनी परस्पर सहकार्य केल्यास लोकांचे जीवनमान उंचावता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.    

यावेळी बांग्लादेश संसदेतील खासदार राझी मोहम्मद फखरूलअल हज नझरुल इस्लाम बाबूसध्या खासदार असलेले बांग्लादेश कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार नईमूर रहमान,फहमी गुलन्दाझ बाबेलनाटोरच्या महापौर असलेल्या हिंदू धर्मीय उमा चौधरीबांग्लादेशाचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मोहम्मद लूतफोर रहमान व ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष धवल देसाई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने या सहा दिवसांच्या भेटीचे आयोजन केले होते.
बांग्लादेशच्या युवा संसद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट बांग्लादेशच्या युवा संसद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 16, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.