.jpg)
निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेचा घेतला आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेतील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील विविध पथके, तक्रार निवारण आणि हेल्पलाईन कक्ष, माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समिती, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग, पोलीस विभाग यांची आढावा बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अमीत खटावकर, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर आणि सुशीलकुमार केंबळे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, सीव्हीजील तथा तक्रार निवारण कक्षाचे नोडल अधिकारी ज. द. मेहेत्रे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अंकुश इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे प्रमुख शार्दुल पाटील यांच्यासह सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक उपस्थित होते.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया यांनी विविध विभागांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च संनियंत्रण कामकाजामधील भूमिका आणि त्यासंदर्भात त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना याचा सखोल आढावा संबंधित वरिष्ठ अधिकारी, सर्व पथक प्रमुख आणि पथकातील सदस्य यांच्याकडून घेतला.
राकेश भदादीया म्हणाले, निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणखी सतर्कता बाळगावी. तसेच, पेड न्यूजच्या प्रकरणांबाबत काटेकोरपणे निगराणी करुन त्याबाबत तत्परतेने खर्च संनियंत्रण कक्षास माहिती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमध्ये सहाय्यक आयुक्त (आयकर) अमित खटावकर यांनी सर्व खर्च सनियंत्रण पथकांना निवडणूक कालावधीमध्ये दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमांच्या जप्तीच्या कारवाईच्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच, आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत खर्च निरीक्षकांना अवगत केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी निवडणुका घोषित झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, जप्तीच्या कारवाया आणि घेण्यात येत असलेली खबरदारी याबाबत विस्तृत आकडेवारीसह माहिती सादर केली. तसेच, भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण पथके यांनी दारू आणि अन्य अंमली पदार्थांच्या जप्तीच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत त्यांनी पथक प्रमुखांना आणि सदस्यांना सखोल मार्गदर्शन केले.
निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेतील भरारी पथके, व्हीडिओ सर्वेक्षण पथके आणि स्थिर सर्वेक्षण पथके यांचे कामकाज पार पाडण्यामध्ये पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे त्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या पूर्वतयारी बाबत जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक (गृह) अंकुश इंगळे यांनी अनुषंगिक माहिती सादर केली. यावेळी राकेश भदादीया यांनी पोलीस कर्मचारी यांनी भरारी पथक, व्हीडिओ सर्वेक्षण पथक आणि स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये कर्तव्य पार पाडत असताना नेमकी काय खबरदारी घ्यावयाची, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
निवडणूक प्रचार कार्यामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबतच सोशल मीडियाचा होणारा वापर आणि त्याबाबत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या मार्फत योजण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत विस्तृत माहिती जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी सादर केली.
स्थिर सर्वेक्षण पथकांच्या कामकाजाची केली पाहणीदरम्यान निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया यांनी दिनांक २९ मार्च २०१९ रोजी जिल्ह्यामध्ये मतदारसंघ कार्यक्षेत्रामध्ये अचानक दौरा केला. यावेळी त्यांनी माधवनगर, बांबवडे, कडेगांव, विटा आणि कुमठे फाटा येथे कार्यरत असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकांना प्रत्यक्ष भेट देऊन पथकांच्या कामकाजाची पाहणी केली. पथकांच्या कामकाजांचा सखोल आढावा घेवून कामकाजामध्ये परिणामकारकता आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघ खर्च नियंत्रण यंत्रणेची पाहणीत्याचप्रमाणे कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास राकेश भदादीया यांनी भेट देवून निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेअंतर्गत कार्यरत विविध पथकांच्या कामकाजाची पाहणी करुन आढावा घेतला. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचार प्रयोजनार्थ करण्यात येणाऱ्या खर्चाचे प्रभावी सनियंत्रण करण्यासाठी कडेगाव - पलूस विधानसभा मतदारसंघअंतर्गत तैनात सहाय्यक खर्च निरीक्षक, व्हीडिओ सर्वेक्षण पथक, व्हीडिओ पाहणी पथक, आदर्श आचारसंहिता कक्ष, तक्रार निवारण कक्ष आणि एक खिडकी कक्ष यांच्या कामकाजाचा आढावा घेवून मार्गदर्शन केले.
निवडणूक खर्च संनियंत्रणाचे कामकाज प्रभावीपणे आणि सतर्कतेने पार पाडा - निवडणूक खर्च निरीक्षक
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 31, 2019
Rating:
No comments: