पिंपरी : भारत स्वच्छ अभियानअंतर्गत दि. ३०/०३/२०१९ रोजी वार्ड क्र.२४, डांगे चौक, थेरगाव येथे धडक मोहीम घेण्यात आली. यामध्ये सार्वजनिक जागेवर थुंकल्यामुळे ५ व्यक्तींकडून ७५०/- रु दंड वसूल करण्यात आला व २ व्यक्तीनी दंड न भरल्याने त्यांच्या पैकी एकाकडून झाडलोट व दुसऱ्यांकडून रस्ता पुसुन घेण्यात आला. तसेच रस्त्यावर घाण करणे कारणावरून ६ व्यक्ती १०८० रु व १० दुकाने तपासण्यात आली, त्यात १ व्यक्ती डस्बीन न ठेवल्याने रु २००/- व इतर १ व्यक्ती रु ५००/- असे एकुण मिळुन रु २५३०/- दंड वसूल करण्यात आला .
तसेच गणेश नगर, वार्ड क्र २४ मधून दि. २९/०३/२०१९ रोजी १६ नंबर ,बेलठिका नगर, येथे प्लास्टिक बंदविषयी कार्यवाही करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे ६००/- रु. च्या, चार पावत्या (प्रत्यकी १५० रु), प्लास्टिकबाबत ५००० रु एक पावती असे एकूण रु ५६०० दंड करण्यात आला. तसेच एकूण ५ कि. ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. दोन दिवसाच्या कार्यवाहीत एकुण रु 8130/- सरकारी खात्यात जमा झाले.
ही कार्यवाही वार्ड क्र २४ चे आरोग्य निरीक्षक श्री. एस. बी. चन्नाल यांनी केली. ही कार्यवाही "ग" क्षेत्रीय सहा. आरोग्य अधिकारी श्री. संजय कुलकर्णी साहेब आणि मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. राजू बेद यांच्या मदतीने करण्यात आली.
सार्वजनिक जागेवर थुंकल्यामुळे महापालिकेकडून कारवाई
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 31, 2019
Rating:

No comments: