भोसरी : पाणी व सांडपाणी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील नामांकित डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीचे 90 कर्मचारी आणि अविरत श्रमदान ग्रुपतर्फे जागतिक जलदिनानिमित्त मोशी येथे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात आली. कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढत इंद्रायणीस जलपर्णीमुक्त करण्यात हातभार लावला आहे. तसेच स्मशानघाट परिसरातील साफसफाई केली.
इंद्रायणी नदी जलपर्णीयुक्त झाली आहे. नदीचा श्वास कोंडला आहे. इंद्रायणीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संघटना काम करत आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली संस्थाच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून अविरतपणे जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे.
विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणा-या चाकण येथील डब्ल्युटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीतर्फे इंद्रायणीतील जलपर्णी काढण्यात आली. जागतिक जलदिनानिमित्त जलपर्णी काढण्यात आली. यामध्ये कंपनीच्या तब्बल 90 कर्मचा-यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढत इंद्रायणी जलपर्णीमुक्त करण्यात हातभार लावला आहे.
जंगलतोड, वाढते शहरीकरण आणि निसर्गामधील अवाजवी मानवी हस्तक्षेप यांमुळे जलचक्रात अनियमितता येत आहे. त्यामुळे मानवासमोर भीषण समस्या म्हणून जलसमस्या उभी आहे. त्यामुळे सर्वत्र स्वच्छता राखा असा संदेश यावेळी देण्यात आला. डब्ल्युटीईच्या कर्मचा-यांसह अविरत श्रमदान ग्रुपचे डॉ. निलेश लोंढे या अभियानात सहभागी झाले होते.
इंद्रायणीस जलपर्णीमुक्त करण्यात, अविरत श्रमदान ग्रुपतर्फे हातभार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 24, 2019
Rating:
No comments: