Seo Services
Seo Services


भोसरी : श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथे ग्रामस्थांच्या वतीने 'एक गाव एक शिवजयंती' या शिवजयंती महोत्सवाचे मोठ्या थाटात व पारंपारिक पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.

चिखलीत होणाऱ्या या शिवजयंतीस पंचक्रोशीतील व शहरातील नागरिकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते. याबाबत शिवजयंती उत्सवासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या परिसरात शिवजयंतीच्या दिवशी फिरते शौचालय व आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

याची दखल घेत महापालिकेने चिखली येथे फिरते शौचालय उपलब्ध करून दिले आहे. शिवजयंती निमित्त नागरिकांची मोठी गैरसोय होते. तसेच पर्यायी व्यवस्था नसल्याने रहिवाशांना मलमूत्र विसर्जनासाठी फिरते स्वच्छतागृहाची (मोबाइल टॉयलेट) आवश्यकता होती, असे यादव यांनी सांगितले.
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 24, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.