Seo Services
Seo Services

प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम



पुणे : जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अँण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) बैठक जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस आदिवासी संशोधन व  प्रशिक्षण संस्थेच्‍या सहसंचालक नंदिनी आवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा समन्वयक सुधीर जोशी, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे,

आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, सदस्‍य-सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.

पुणे जिल्‍ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील पेड न्‍यूज (प्रदत्‍त बातमी) तसेच सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी दिल्‍या. या माध्‍यमांवर विना परवानगी जाहिराती आढळून आल्‍यास तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे निर्देशही  त्‍यांनी दिले.  नवीन मध्‍यवर्ती इमारतीमध्‍ये जिल्‍हा माहिती कार्यालयात एमसीएमसी कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून विहीत नमुन्‍यातील अर्ज भरुन सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जाईल, असे सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितले. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयातील तळमजल्‍यावरील मिडीया सेंटरमध्‍ये तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा- जिल्‍हाधिकारी राम Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 28, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.