पुणे : पुणे जिल्ह्यातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (अे) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यात दि. 27 मे 2019 अखेरपर्यंत स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे/हत्यारे दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई केली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बॅंका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही. याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची अधिकाऱ्यांवर राहिल.
सदरचा आदेश दि. 27 मे 2019 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
जिल्हादंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 28, 2019
Rating:

No comments: