शैक्षणिक संस्थांनी उत्कृष्टतेचे केंद्र होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, विद्यार्थ्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करावी, यासाठी उद्योग क्षेत्रासमवेत संवाद ठेवा – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना दर्जेदार, माफक खर्चातले आणि अर्थपूर्ण शिक्षण देणारे सर्वोत्कृष्टतेचे केंद्र ठरण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. जागतिक रोजगार बाजारपेठेतल्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवता यावे आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी उद्योग क्षेत्राशी संवाद ठेवावा असे ते म्हणाजे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्यात प्रविण करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात ज्ञान आणि कौशल्याला सर्वाधिक महत्व दिले गेले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत एका पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते.
कृषी क्षेत्र अधिक व्यवहार्य आणि किफायतशीर करत ग्रामीण भारतावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यावर त्यांनी भर दिला.
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करा – उपराष्ट्रपती
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 28, 2019
Rating:
No comments: