Seo Services
Seo Services

जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाबूजींच्या स्मृतींना उजाळा



29 मार्चपर्यंत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

मुंबई : महाराष्ट्राच्या मनामनांत रुजलेले विख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रऑडिओ-व्हिडिओसांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जन्मशताब्दी महोत्सवाचे दि. 25 ते 29 मार्च 2019 या कालावधीत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके व ज्येष्ठ गायक व लेखक आनंद माडगूळकर यांच्या हस्ते आज झाले.

सांस्कृतिक जगतातील मानबिंदू असलेल्या संगीतकाराचा सांगीतिक प्रवास या महोत्सवाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. रविंद्र नाट्य मंदिराच्या कलांगण प्रांगणात दररोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे उपस्थित होत्या. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ग.दि.माडगूळकर विरचित आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या  ʻगीतरामायणाचेʼ प्रख्यात संगीतकार श्रीधर फडके आणि आनंद माडगूळकर यांनी सादरीकरण झाले. या चित्रप्रदर्शनास आणि सांस्कृतिक कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला.

उद्या, दि.26 मार्च रोजी रघुलीला एंटरप्रायझेस,मुंबई निर्मित ʻशब्द सूर त्रिवेणीʼ,दि.27 मार्च रोजी कलाअर्पितापुणे निर्मित  स्वयंवर झाले सीतेचेʼ  ही नृत्य नाटिकादि. 28 मार्च रोजी संवादसेतू,पुणे निर्मित  इथेच टाका तंबूʼ  या बाबूजी व गदिमांच्या स्वरयात्रेचा कार्यक्रम तसेच दि.29 मार्च रोजी षड्ज पंचममुंबई निर्मितʻअशी पाखरे येतीʼ  या सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्व रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळणार आहे. दि. 26 मार्च रोजी सुधीर फडके निर्मित  व संगीतबद्ध केलेल्याʻवीर सावरकरʼ, दि.27 मार्च रोजी  ʻजगाच्या पाठीवरʼ तसेच दि. 28 मार्च रोजीʻमुंबईचा जावईʼ या चित्रपटांचा महोत्सव मिनी थिएटरपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे रोज दु.3.30 वाजता होणार आहे. 

या गानमहर्षींच्या जीवनावर आधारित  29 मार्चपर्यंत दुपारी.12 ते रात्रौ.8 वाजेपर्यंत आर्ट गॅलरीपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे चित्रांकित आलेख दर्शविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन तसेच याच कालावधीत कलांगणरविंद्र नाट्य मंदिराचे प्रांगण येथे नामवंत लेखकांच्या दर्जेदार साहित्यांचे प्रदर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने मांडले जाणार आहे.  जन्मशताब्दीच्या निमित्ताने बाबूजींच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार असल्याने  कार्यक्रमांसाठी व प्रदर्शनासाठी  प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक श्रीमती स्वाती काळे यांनी केले आहे.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाबूजींच्या स्मृतींना उजाळा जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाबूजींच्या स्मृतींना उजाळा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 26, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.