मुंबई : दाऊद इब्राहिम भारताकडे आत्मसमर्पण करण्यास तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे, मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला.
1993 च्या मुंबईत बाॅम्बस्फोट आणि दंगलीचा मस्टरमाइंड असल्याचा, संशयित आरोपी दाऊद भारताला द्या अशी भीक मागणऱ्यांनी आता संधी गमावलेली आहे, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी प्रस्ताव का फेटाळला? कोणाच्या सांगण्यावरुन फेटाळला? आणि हे उघड झाल्यानंतर सध्याच्या भाजप सरकारने का प्रयत्न केले नाहीत याचा खुलासा करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.
दाऊदच्या भारतवापसीची संधी शरद पवारांमुळे हुकली- प्रकाश आंबेडकर
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 19, 2019
Rating:
No comments: